भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे बॅनर बीडमध्ये ठीक ठिकाणी लागले आहेत. मात्र या बॅनरवर धनंजय मुंडे यांच्या फोटोला वगळण्यात आलंय.सरपंच देशमुख हत्या प्रकरण आणि महादेव मुंडे खून प्रकरणामुळे मुंडेवर टीकेची झोड उठली. त्यामुळे बॅनरवरूनही त्यांना वगळण्यात आलंय. तर दुसरीकडे आष्टीमध्येही स्थानिक आमदार सुरेश धस यांचा फोटो वगळण्यात आलाय. त्यामुळे जिल्ह्यात राजकीय चर्चेला उधाण आले आहे.