Ashok Kharat प्रकरण | समता पतसंस्थेच्या 100 बनावट खात्यात Pratibha Chakankar यांची चौकशी होणार

अशोक खरातच्या समता पतसंस्थेच्या 100 बनावट खात्यात आता प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली... प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या नावे समता पतसंस्थेत असलेल्या संशयास्पद बँक खात्यातून तब्बल दोन कोटी 40 लाखांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचं समोर आलंय.. प्रतिभा चाकणकर यांना शिर्डी पोलिसांनी चौकशीसाठी नोटीस पाठवण्याची खात्रीलायक माहिती समोर आली.. चाकणकर आणि त्यांच्या मुलाच्या नावे समता पतसंस्थेत चार खाती असून चारही खात्यातून एकूण 2 कोटी 40 लाखांचे व्यवहार झाल्याची बाब समोर आलीये.. समता पतसंस्थेतील बनावट खाते चौकशीदरम्यान शिर्डी पोलिसांकडून चाकणकरांना चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ