अशोक खरातचे काळे कारनामे आता समोर येतायत. अशोक खरात अघोरी कृत्य कसं करायचा.. लोकांकडून पैसे कसे उकळायचा याची धक्कादायक माहिती समोर आलीय. रिमोट कंट्रोलच्या आधारे नकली सापाच्या हालचालींनी चमत्कार दाखवत तो लोकांची फसवणूक करायचा. नकली सापासोबतच वाघाचं कातडही दाखवायचा. बाजारात स्वस्त मिळणारे रानटी चिंचोके पॉलिश करून महागात विक्री करायचा. चिंचोके मंतरलेले असल्याचे सांगत पीडितांना घरात ठेवायला सांगायचा. स्वतमध्ये दैवी शक्ती असल्याचं सांगत नकली खडे आणि रत्ने द्यायचा.. समोरच्या व्यक्तीची आर्थिक क्षमता हजारो ते लाखो रुपयांना गंडा घालायचा..