भोंदूबाबा अशोक खरात याच्या फसवणुकीचे नवे धागेदोरे उलगडत असतानाच, आता एका व्यावसायिकालाही त्याने कसा गंडा घातल्याचं समोर आलंय. अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा येथील व्यावसायिक राजेंद्र भागवत हे व्यवसाय वृद्धीच्या आशेने खरातच्या संपर्कात आले. पण श्रद्धेच्या नावाखाली त्यांच्याशी थेट आर्थिक फसवणूक करण्यात आली.सोन्याच्या अंगठ्या घाला, व्यवसाय वाढेल,” असा सल्ला देत खरातने त्यांच्याकडून 20 ग्रॅमच्या दोन सोन्याच्या अंगठ्या आणि तब्बल 2 लाख 62 हजार रुपये उकळलेत. यासंदर्भात राजेंद्र भागवत यांनी SIT कडे तक्रार दाखल केली आहे.