वृद्धापकाळात आई वडिलांना ओझं समजणाऱ्या.. तसंच त्यांचा सांभाळ न करणाऱ्या मुलांवर आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली जाणार आहे.. एखाद्या मुलाने आपल्या आई वडिलांची काळजी घेतली नाही तर त्याचा पगार कापला जाणार आहे. एकूण पगारातून 15 टक्के रक्कम किंवा 10 हजार रुपये जी जास्त असेल ती कापली जाईल. विशेष म्हणजे हा कायदा सरकारी कर्मचाऱ्यांसोबतच खासगी कर्मचाऱ्यांनाही लागू होईल. तसंच देशात पहिल्यांदाच आमदार, खासदार आणि सरपंचानाही हा कायदा लागू करण्यात आलाय. तेलंगणा राज्य विधानसभेने रविवारी पॅरेंटल सपोर्ट बिल 2026 एकमताने मंजूर केलं. त्यात जन्मदात्या आई वडिलांसाठी हा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलाय. हे विधेयक मांडताना मुख्यमंत्री रेवंत रेड्डी भावूक झाले होते.