चौकशीला का येत नाही?, Rupali Chakankar यांचा अजब-गजब दावा; चाकणकर आहेत तरी कुठे? Special Report

अशोक खरातशी संबंध असल्याचं पुढे आलेलं सगळ्यात पहिलं नाव म्हणजे रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकरांचे खरातबरोबर असलेले डझनभर फोटो, खरातच्या संस्थेवर रुपाली चाकणकर ट्रस्टी होत्या. एवढंच नव्हे तर अनेक महिलांना रुपाली चाकणकरांनीच खरातकडे पाठवल्याचाही आरोप झाला. आता या सगळ्या प्रकरणात रुपाली चाकणकरांची चौकशी होणार आहे. तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखालचं SIT पथक अशोक खरात प्रकरणाचा तपास करतंय. या SIT नं रुपाली चाकणकरांना चौकशीसाठी समन्स पाठवलं. त्यानंतर चाकणकरांनी जे कारण दिलंय. ते अतिशय अजब आहे. चाकणकर म्हणतायत.आपण महिला आहोत.आणि महिला असल्यानं प्रवासाला जास्त वेळ लागतो. या दाव्यामागचं लॉजिक काय, हे चाकणकरांनाच माहीत. पण या निमित्तानं आणखी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झालाय तो म्हणजे रुपाली चाकणकर आहेत कुठे?

संबंधित व्हिडीओ