महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या रात्री रंगलेल्या एका पार्टीची जोरदार चर्चा आहे. ही पार्टी दिली भाजप नेते मोहित कंबोज यांनी कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या या पार्टीमध्ये बॉलिवूडचे अॅक्टर्स होते.मोठमोठे राजकीय नेते होते. उद्योगपती होते. पण या पार्टीत एक पाहुणा आला.आणि सगळ्यांना मोठा धक्का बसला.तो पाहुणा म्हणजे आदित्य ठाकरे मोहित कंबोज यांच्या पार्टीमध्ये आदित्य ठाकरेंची एन्ट्री होताच एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे कंबोज यांच्या पार्टीला आदित्य ठाकरे कसे काय आले.आदित्य ठाकरे या पार्टीत येताच सगळ्यांच्या भुवया का उंचावल्या. आणि ही पार्टी एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर राज्याच्या राजकारणातल्या मोठ्या बदलांचे हे संकेत आहेत का. पाहुया एक स्पेशल रिपोर्ट.