तथाकथित ज्योतिषी अशोक खरातमुळे आता रुपाली चाकणकरांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.. कारण खरातच्या मिरगावमधलं शिवनिक संस्थान तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. शिवनिका संस्थानच्या बँक अकाउंटचा वापर ब्लॅकचा पैसा व्हाईट करण्यासाठी खरातकडून केला जायचा असा तपास यंत्रणांना संशय आहे. संस्थानचे आर्थिक व्यवहार तपासले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे शिवनिका संस्थानच्या आजी माजी विश्वस्ताची चौकशी होण्याची शक्यता आहे. रुपाली चाकणकरही या संस्थानच्या विश्वस्त होत्या.