खगोलशास्त्र प्रेमींसाठी एप्रिल 2026 हा महिना खूपच रोमांचक ठरणार आहे. 16 ते 23 एप्रिल दरम्यान बुध, मंगळ, शनि आणि नेपच्यून हे चार ग्रह एका रेषेत उगवती दिशेला दिसणार आहेत. ही घटना ‘प्लॅनेटरी अलाइनमेंट’ म्हणून ओळखली जाते. अंतराळात खरोखरच एकमेकांच्या जवळ नसले तरी पृथ्वीवरून पाहताना हे ग्रह एका सरळ रेषेत दिसतात. भारतातून हे दृश्य स्पष्ट दिसेल, पण यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठावे लागेल. 18 ते 20 एप्रिल ही तीन दिवस सर्वोत्तम आहेत. विशेषतः 20 एप्रिलला तीन ग्रह इतके जवळ येतील की तीन बोटांनी झाकता येतील. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.