सांगलीत भरवस्तीमध्ये घडलेल्या धक्कादायक गोळीबाराच्या घटनेने शहर हादरलं आहे. संजय नगर परिसरात चार ते पाच अज्ञातांनी थेट घरात घुसून केलेल्या गोळीबारात १४ वर्षीय वेदांत मारुती बंडगर याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.माथाडी नेते बाळासाहेब बंडगर यांचा मुलगा असलेल्या वेदांतच्या डोळ्यात गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. हल्लेखोरांनी आधी हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर घरात असलेल्या वेदांतवर गोळ्या झाडल्या.