बंजारा समाजाने छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील केंब्रिज चौकात मोठे रास्ता रोको आंदोलन केले आहे. हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळावे, ही त्यांची प्रमुख मागणी आहे. मराठा समाजाला ज्याप्रमाणे हैदराबाद गॅझेट लागू करण्यात आले, त्याच धर्तीवर बंजारा समाजालाही एसटी आरक्षण मिळावे, अशी त्यांची मागणी आहे. या आंदोलनामुळे परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.