#MumbaiAirport #EmergencyLanding #SpiceJet मुंबई विमानतळावर एका मोठ्या दुर्घटनेची शक्यता टळली आहे. स्पाईसजेटच्या विमानाचे चाक निखळल्याने तातडीने इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. या घटनेमुळे मुंबई विमानतळावर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता, मात्र एअरपोर्ट कर्मचाऱ्यांनी परिस्थिती योग्यरित्या हाताळली