ठाणे महानगरपालिकेने दिवा प्रभाग समितीतील शीळ फाटा येथे अवैध बांधकामावर तोडक कारवाई सुरू केली आहे. यामुळे आयुष्यभराची कमाई घालून घर घेतलेली अनेक कुटुंबं बेघर झाली आहेत. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारती अधिकृत आहेत की अनधिकृत, याची माहिती दिली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.