Manoj Jarange यांचा Chhagan Bhujbal यांच्यावर निशाणा 'विसरभोळे मंत्री', 32% आरक्षण खाल्ल्याचा आरोप!

छगन भुजबळ हे आता ‘विसरभोळे मंत्री’ झाले आहेत, असा घणाघाती आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. भुजबळांनी ३२% आरक्षण खाल्लं असा गंभीर आरोप करत त्यांनी ओबीसी समाजाची दिशाभूल करत असल्याचा दावाही केला. जरांगे म्हणाले की, भुजबळ आता अंधश्रद्धा बाळगत आहेत. ते म्हणाले, "याने आतापर्यंत आमचं आरक्षण खाल्लं आहे, ते आम्ही आता परत घेत आहोत. गरीब ओबीसी लोकांनी हे समजून घ्यावं. तुम्ही एवढे दिवस आरक्षण खात होता, आता तुम्ही प्रगत झाला आहात, ते सोडा ना!" याचबरोबर, राजकारणासाठी भुजबळ ओबीसींना उलट्या गोष्टी समजावून सांगत आहेत. त्यांचे ऐकू नका असे आवाहनही त्यांनी केले. जरांगे यांनी भुजबळांवर व्यक्तिगत टीका करताना त्यांना 'जनावर' म्हटले असून, त्यांना नेपाळ, इंग्लंड अशा ठिकाणी सोडून यायला हवे असे वादग्रस्त विधानही केले आहे. म्हाज्योती आणि सारथी संस्थेवरही त्यांनी टीका केली. १९९४ चा जीआर भुजबळांनी काढायला लावला, ज्यामुळे मराठ्यांचे नुकसान झाले असा आरोपही त्यांनी केला.

संबंधित व्हिडीओ