Chhagan Bhujbal On Manoj Jarange | जरांगेंच्या कार्यकर्त्यांचा मुंबई-बीडमध्ये हैदोस! भुजबळांचा आरोप

#NDTVMarathi #MarathaReservation #ChhaganBhujbal मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. छगन भुजबळ यांनी मराठा आंदोलकांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्या मते, जरांगे यांच्या कार्यकर्त्यांनी मागील वर्षी बीड जिल्हा जाळला आणि नुकत्याच झालेल्या आंदोलनावेळी मुंबईमध्येही हैदोस घातला. कुणबी समाजाला आपला विरोध नाही, मात्र आता सर्व मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी दबावतंत्र वापरले जात असल्याचा दावा भुजबळांनी केला. याचबरोबर, मोदी सरकारने मराठा समाजाला EWS आणि 10% आरक्षण दिले आहे. आता ते कुणबीमधून आरक्षण मागत असल्याचं भुजबळ यांनी म्हटलं. मुंबईतील हिंसक आंदोलनामुळे सरकारने दबावात येऊन मराठा आरक्षणाचा जीआर काढला, जो ओबीसींच्या मुळावर उठला आहे, असा खळबळजनक दावा भुजबळांनी लातूरमध्ये केला.

संबंधित व्हिडीओ