Solapur Rains | सोलापूरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, जनावरे वाहून गेली | NDTV मराठी

सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे पशुपालकांचे मोठे नुकसान झाले आहे. सांगवी गावातील एका शेतकऱ्याच्या शेळ्या-बोकड ओढ्याच्या पाण्यात वाहून गेल्या. शेतकऱ्याने वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. त्यामुळे प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.

संबंधित व्हिडीओ