एल्फिन्स्टन पूल बंद पडू देणार नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे गटाचे नेते समाधान सरवणकर यांनी दिली आहे. तर सरकार कुणालाही बेघर करणार नाही, असे आश्वासन भाजप नेते आशिष शेलार यांनी दिले आहे. या दोन्ही प्रतिक्रिया पूल आणि पुनर्वसनाच्या मुद्द्यावर लोकांच्या चिंतेनंतर आल्या आहेत.