लातूरमधील एका ओबीसी तरुणाने जीवन संपवल्यानंतर मनोज जरांगे यांनी कुणीही टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन केले आहे. राजकारणी केवळ राजकारण करतात आणि कुटुंब उघड्यावर पडते, असे म्हणत त्यांनी भुजबळांवर नाव न घेता टीका केली. त्याचबरोबर एसईबीसीचे आरक्षण 50 टक्क्यांच्या आत हवे, असे विधानही त्यांनी केले.