नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीच्या अपहरणाची धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेमातून तरुणाने तलवारीच्या धाकावर मुलीचे अपहरण केले होते, मात्र गणेशपेठ पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मुलीची सुटका केली आणि आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांच्या जलद कामगिरीचे कौतुक होत आहे.