महादेवी हत्तीण प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात सुरू झाली. हत्तीणीला 'वनतारा'कडे सोपवल्याने कोल्हापूरकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्यानंतर राज्य सरकार आणि मठाने याचिका दाखल केली होती. एक महिन्यापासून यावर सुनावणी झाली नव्हती. आज न्यायालय या प्रकरणी काही महत्त्वाचे निर्देश देईल अशी अपेक्षा आहे.