पुण्यातील मंचर शहरात रस्त्याचे काम सुरू असताना दर्ग्याखाली अचानक भुयारासारखी रचना आढळून आली. हे भुयार पुरातनकालीन आहे का, याची तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्त्व विभागाला पाचारण केले आहे. परिसरात कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.