बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण मिळावे, यासाठी छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. तर, दुसरीकडे जालन्यात बंजारा समाजाला आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. एकाच विषयावर राज्यातील दोन वेगवेगळ्या शहरांमध्ये समर्थक आणि विरोधक असे दोन गट आमनेसामने आल्याचे चित्र आहे.