बीडच्या आष्टी तालुक्यात ढगफुटीसदृश्य पावसाने हाहाकार माजवला आहे. देवळालीसह सुलेमान, देवळा, दौलावडगाव या गावांत पाणी शिरल्याने त्यांचा संपर्क तुटला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अहिल्यानगर-बीड मार्गावरील धानोरा येथील कांबळी नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे