छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला दुसऱ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. सिल्लोड तालुक्यातील अनेक भागांमध्ये सकाळपासून जोरदार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे देऊळगाव बाजार येथील चारणा नदीला पूर आला आहे. अनेक शेतांमध्ये आणि काही ठिकाणी गोठ्यांमध्ये देखील पाणी शिरले आहे.