पुण्याच्या इंदापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सणसर येथील ओढ्याला पूर आला आहे. या पुराचे पाणी सणसर रायते मळा परिसरातील काही नागरिकांच्या घरात शिरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.