Beed Cloudburst | बीडमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, गावांचा संपर्क तुटला

बीडच्या आष्टी तालुक्यात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. देवळालीसह सुलेमान, देवळा, दौलावडगाव या गावांत पाणी शिरल्याने संपर्क तुटला आहे. शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, अनेक नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. अहिल्यानगर-बीड मार्गावरील धानोरा येथील कांबळी नदीला पूर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. प्रशासनाकडून मदतकार्य सुरू असून, नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित व्हिडीओ