परतीच्या पावसामुळे मुंबईसह नवी मुंबई, गोरेगाव, सांताक्रुझ, आणि ठाण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. दक्षिण मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे. आज आणि उद्या कोकण किनारपट्टी, मुंबई आणि ठाण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुंबईतील सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली असून, रेल्वे स्थानकांवरही पाणी जमा झाले आहे. कुर्ला स्थानकावरील रुळांवर पाणी साचले आहे, तर अंधेरी सबवेमध्ये एक ते दीड फूट पाणी साचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. गोखले ब्रिज मार्गे वाहतूक वळविण्यात आली असून, हार्बर आणि मध्य रेल्वेवरील वाहतूक उशिराने सुरू आहे