गेल्या दोन दिवसांपासून मराठवाड्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कातपूर गावात शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली गेली असून, ऊस आणि इतर पिके अजूनही पाण्यात बुडालेली आहेत. ही विदारक दृश्ये विकास गाडे यांच्या ड्रोनमधून टिपली आहेत. शेतीत झालेल्या या नुकसानीचा आढावा आमचे प्रतिनिधी मोसीन शेख यांनी घेतला आहे