Beed| मृत दाखवलेलं बाळ अंत्यसंस्कारावेळी रडू लागलं, नेमकं काय घडलंय बीडच्या अंबाजोगाईत? NDTV मराठी

बीडच्या अंबाजोगाईत एक वेगळाच प्रकार घडलाय.. आंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयात डॉक्टरांनी एका बाळाला मृत घोषित केलं होतं, दु:खाचा डोंगर कोसळलेल्या नातेवाईकांनी हे बाळ घेऊन आपल्या गावी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली पण याच वेळी बाळ रडू लागलं आणि नातेवाईक आश्चर्यचकित झाले, नातेवाईकांनी परत त्याच रुग्णालयात धाव घेत या बाळाला अतिदक्षता कक्षात दाखल केलं. केज तालुक्यातील होळ इथल्या घुगे कुटुंबासोबत ही घटना घडली असून या कुटुंबाने अद्याप या प्रकरणाची कुठलीही तक्रार रुग्णालय प्रशासनाकडे केलेली नाही. पण रुग्णालयाच्या या गलथान कारभाराबाबत संताप व्यक्त केला जातोय.

संबंधित व्हिडीओ