Navi Mumbai पोलिसांना एका बापाची आर्त हाक, मृत मुलाला न्याय मिळावं यासाठी आंदोलन; नेमकं प्रकरण काय?

नवी मुंबईतील बेलापूर येथील पोलीस आयुक्तालयाजवळ अयूब कुरेशी यांनी मुलगा परवेजच्या मृत्यूची पुनर्तपासणी करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केलं आहे.३० ऑक्टोबर २०२३ रोजी परवेजचा मृतदेह हनुमाननगर येथील नाल्यात आढळला होता. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास बंद केला. मात्र, घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये परवेजची रिक्षा आणि त्यानंतर आलेली इको कार दिसत असल्याचा दावा अयूब कुरेशी यांनी केला आहे. कारच्या काचेतून एक व्यक्ती मृतदेह नाल्यात टाकताना दिसत असल्याचा त्यांचा आरोप आहे. या सीसीटीव्हीच्या आधारे अनेकदा एफआयआर दाखल करण्याची मागणी करूनही कारवाई झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.

संबंधित व्हिडीओ