Global News| अमेरिकेला भारतीय उद्योग समुहाचा आसरा, मेसाबी मेटॅलिक्स आयोवामध्ये उभारणार मोठा प्लांट

भारतीय उद्योग समूह अमेरिकेत मोठा प्रकल्प उभारणार आहे. अमेरिकन अध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमधून याची घोषणा केलीय. भारताच्या एस्सार ग्रुपच्या सहकार्यानं अमेरिकेत मोठ्या स्टील प्रकल्पाची घोषणा ट्रम्प यांनी केलीय. आयोवामध्ये ट्रम्प यांनी 15 अब्ज डॉलर्सच्या स्टील संकुलाची योजना सादर केली, ही योजना एस्सार ग्रुपची कंपनी - मेसाबी मेटॅलिक्सद्वारे - विकसित केली जाईल. ट्रम्प यांनी याला अमेरिकेच्या उत्पादन क्षेत्रातील एक मोठी गुंतवणूक म्हटले आहे. या घोषणेवेळी एस्सार ग्रुपचे अध्यक्ष रेवंत रुईयादेखील ट्रम्प यांच्यासोबत उपस्थित होते आणि त्यांनी अमेरिकेतील उत्पादनाला प्रोत्साहन दिल्याबद्दल ट्रम्प यांचे आभार मानले. व्हाईट हाऊसमध्ये या प्रकल्पाची घोषणा करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी याला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा स्टील कारखाना म्हणून संबोधले. या कारखान्याची वार्षिक उत्पादन क्षमता अंदाजे 1 कोटी स्टीलची असेल, असं सांगितलं जातंय.

संबंधित व्हिडीओ