बीडमध्ये 1200 रूपयांसाठी सालगड्याचे अपहरण झाल्याची घटना घडली.तर यात मध्यस्थी करणाऱ्या सेवानिवृत्त पोलिसालाही मारहाण झालीये.जंगलात नेऊन सेवानिवृत्त पोलिसाला अमानुष मारहाण करण्यात आलीये.ऊसतोड मुकादम आणि त्याच्या साथीदारांकडून ही मारहाण झाली. राजाराम सिरसट या सेवानिवृत्त अधिकाऱ्याला ही मारहाण झालीये..तसंच दीड लाख रूपये लुटून त्यांच्या अंगावर लघुशंका केल्याचाही घृणास्पद प्रकार समोर आलाय. यातील अद्याप एकाच आरोपीला अटक झालीये. तर इतर फरार आहेत...