पुण्यातील इराणी गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित करण्यात आलाय.बनमस्कामध्ये काचेचे तुकडे आढळल्याप्रकरणी गुडलक कॅफेवर कारवाई झालीये. दोन दिवसांपुर्वी आकाश जलगी हे आपल्या पत्नीसोबत कॅफेत गेले होते. त्यावेळी त्यांनी ऑर्डर केलेल्या बनमस्क्यात काचेचे तुकडे आढळले. यानंतर त्यांनी एफडीआयकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली.