भिवंडीतील दोन मजली अतिधोकादायक शौचालय इमारतीकडे महापालिकेनं दुर्लक्ष केलंय.जीवघेणी परिस्थितीत असताना नागरिकांकडून शौचालयाचा वापर करण्यात आलीय. भिवंडी शहरातील शांती नगर परिसरातील तय्यबा नगर येथे महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालय सध्या धोकादायक परिस्थितीत आहे.महानगरपालिकेने काही वर्षांपूर्वी पुरुष आणि महिलांसाठी बांधलेले हे दोन मजली २० आसनांचे शौचालय आहे.