कुख्यात गुंड निलेश घायवाळ हा 'पृथ्वीराज एंटरप्राइजेस' (Prithviraj Enterprises) च्या माध्यमातून खंडणीचे पैसे उकळत असल्याचा खळबळजनक खुलासा झाला आहे. अमोल लाखे हा आपल्या फर्ममार्फत घायवाळच्या ड्रायव्हरच्या (माऊली तोंडे) पत्नीच्या नावावर पैसे देत होता. कॅश व्यवहारात अडचण आल्यास हा मार्ग वापरला जाई. माऊली तोंडे हा मुळशीचा सरपंच असल्याचीही माहिती आहे. या खंडणी प्रकरणाच्या मुळाशी पोलीस तपास करत आहेत.