आजच्या १२ वाजताच्या बुलेटिनमध्ये बघा दिवसभरातील चार मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या! मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मुंडे बंधू-भगिनींना थेट इशारा दिला आहे. "माझ्या नादी लागू नका" असं जरांगे का म्हणाले आणि त्यांच्या इशाऱ्यामागे नेमकं काय कारण आहे? या सविस्तर बातमीसह, राज ठाकरेंच्या निवासस्थानी सुरू असलेल्या मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ठाकरे गटासोबतच्या युतीवर विचारमंथन सुरू आहे. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचे महत्त्वाचे अपडेट्स जाणून घ्या. तसेच, नागपूरमध्ये 'मेंदूज्वर' सदृश संशयित आजारानं ९ मुलांचे बळी घेतले आहेत, तर १४ रुग्ण अजूनही दाखल आहेत. या गंभीर घटनेचं गूढ आणि प्रशासनाची तयारी काय आहे? आणि एक धक्कादायक बातमी पुण्यातून. टीव्ही बंद करायला सांगितल्याने एका ३३ वर्षीय तरुणानं आपल्या वडिलांचीच हत्या केली! काय आहे ही क्राईम स्टोरी? बघा NDTV Marathi च्या या स्पेशल बुलेटिनमध्ये