पुण्यातल्या खराडी पार्टी प्रकरणातील आरोपी आणि शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये त्यांनी कोणत्याही अमली पदार्थांचे सेवन केले नसल्याचा खुलासा झाला आहे. २५ सप्टेंबर रोजी त्यांना जामीन मिळाला होता. आता या अहवालामुळे रोहिणी खडसे यांच्यासह कुटुंबाला दिलासा मिळाला आहे. मात्र, पार्टीत अमली पदार्थ कोणी पुरवले, याचा तपास अजून सुरू आहे.