वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत 'ती १४ गावं नकोत,' असे सांगत नाईकांनी थेट हल्लाबोल केला. 'कुणाच्या तरी लहरीपणामुळे झालेल्या गोष्टींचा बोजा आम्ही नवी मुंबईवर का टाकू?' असा सवाल करत त्यांनी शिंदे गटासोबतचा वाद पुन्हा चव्हाट्यावर आणला आहे.