Mumbai महापालिकेच्या FD मध्ये 5 वर्षांमध्ये मोठी घट, Congress गटनेते आश्रफ आझमींचा दावा

मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवी म्हणजेच एफडीमध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये 11 हजार 817 कोटींची घट झालीय. २०२१ मध्ये ९१ हजार ६९० कोटींच्या एफडी ऑक्टबर 2026मध्ये 79 कोटींपर्यंत खाली घसरल्याचा दावा करण्यात आलाय. एफडीमधील निधी कोणत्या प्रकल्पांसाठी आणि खर्चासाठी वापरला, असा सवाल काँग्रेस गटनेते अश्रफ आझमींनी केलाय. त्यांनी या संदर्भात मुंबई पालिका आयुक्तांना पत्र लिहलंय. बीएमसीने २०२१ ते सप्टेंबर २०२६ पर्यंतचा व्हाईट पेपर जाहीर करावा अशी मागणीही अश्रफ आझमींनी केलीय.

संबंधित व्हिडीओ