Satara | महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज का नाही ?, दुष्काळात महिलांसाठी डॉ. फौजिया खान यांची मागणी

सातारा जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती गंभीर होत असताना आता महिलांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारचे लक्ष वेधले आहे. दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची होणारी पायपीट, आरोग्याच्या समस्या, कुपोषण, मानसिक तणाव आणि वाढणारा कौटुंबिक हिंसाचार या प्रश्नांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. शेतकरी आणि पशुधनासाठी मदतीचे नियोजन होते, मग दुष्काळाचा सर्वाधिक भार सहन करणाऱ्या महिलांसाठी स्वतंत्र आर्थिक पॅकेज का नाही? असा सवाल डॉ. फौजिया खान यांनी उपस्थित केलाय.

संबंधित व्हिडीओ