तुम्ही एखाद्या नव्या घरात रहायला जाता तेव्हा काय करता, त्या घराचा इतिहास पाहता, त्याच्या दिशा पाहता, त्याचं वास्तुशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करता, मग आपापल्या धार्मिक किंवा सांस्कृतिक पद्धतीप्रमाणे पुजा अर्चा करता आणि घरात प्रवेशकर्ते होता. पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घराबाबत मात्र तसं घडत नाहीय.राज्यात नवं सरकार स्थापन होऊन आता महिना उलटून गेलाय. पण राज्याचे मुख्यमंत्री, त्यांना राज्याने दिलेल्या घरात म्हणजे वर्षा बंगल्यात रहायला गेलेले नाहीत.राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा बंगला म्हणजे सगळ्यात मोठा बंगला आधीच्या मुख्यमंत्र्यांनी बंगला रिकामाही केलाय.पण तरीही नवे मुख्यमंत्री वर्षा बंगल्यावर रहायला जात का नाहीत यावर सध्या नवं वाकयुद्ध सुरू झालंय.