मुंबई हायकोर्टाने निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे.विधानसभा मतदानाच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यानंतर मतदानात वाढ झाल्याचा दावा करत मतदानात घोळ झाल्याचा आरोप करण्यात आलाय. याप्रकरणी एक याचिका मुंबई हायकोर्टात करण्यात आली होती.त्यावरील सुनावणीदरम्यान हायकोर्टाने ही नोटीस बजावलीय. मतदानाच्या दिवशीचे संध्याकाळी 6 नंतरच्या मतदानाचे व्हिडिओ उपलब्ध करून द्यावेत, असे आदेश निवडणूक आयोगाला हायकोर्टाने दिलेत..विशेष म्हणजे या सुनावणीदरम्यान प्रकाश आंबेडकरांनी युक्तिवाद केलाय.