देशमुख हत्या प्रकरणात महत्वाचे पुरावे हे फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याकडून नष्ट केले जातील, अशी भीती दिवंगत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुखांनी केलीय. पुराव्यांसोबत खरोखरच छेडछाड झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची असेल, असंही ते म्हणालेत. म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची स्वत:हून दखल घ्यावी अशी मागणीही त्यांनी केलीय.