बीड हत्या प्रकरणात अडचणीत असलेल्या धनंजय मुंडे यांच्याबाबत आता एक नवा दावा समोर आलाय.विधानसभा निवडणुकीत मनोज जरांगे पाटील हा फॅक्टर चालणार अशी जोरदार चर्चा होती, पण याचीच धनंजय मुंडेंना भीती होती का?, असा प्रश्न विचारला जातोय, याचं कारण म्हणजे मनोज जरांगे पाटलांनी छत्रपती संभाजीनगरमधून केलेला दावा. निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांनी रात्री येऊन आपली भेट घेतली होती.असा दावा मनोज जरांगे पाटलांनी केलाय, दुसरीकडे अंजली दमानियांनीही धनंजय मुंडेंविरोधात मोठा पुरावा देणार असल्याची घोषणा केलीय.