मुंबईकरांना मोदी सरकारने एक मोठं गिफ्ट दिलंय. मुंबईकरांच्या सेवेत नव्या 300 लोकल लवकरच दाखल होतायत. विशेष म्हणजे मुंबईसाठी नव्या खास डिझाईनच्या लोकल तयार करण्यात आल्यात. नव्या लोकल्समुळे मुंबईकरांचा प्रवास अधिक सुखकर आणि सुरक्षित होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिलीय.