सर्बिया सध्या धुमसतोय. निमित्त ठरलं ते नोव्हेंबर महिन्यात नोव्ही सॅडमधील रेल्वे दुर्घटनेचं. या दुर्घटनेत १५ जणांनी जीव गमावला. शनिवारी त्या घटनेला तीन महिने झाले. गेले तीन महिने तिथं सातत्यानं सत्ताधाऱ्यांविरोधात रोष व्यक्त होतोय. विद्यार्थी आंदोलनांनी कळस गाठलाय. अखेर गेल्या मंगळवारी पंतप्रधानांनाही पायउतार व्हावं लागलं. पाहूया काय नेमकं घडतंय, सर्बियामध्ये...