महाराष्ट्रातल्या शक्तीपीठ या नव्या एक्स्प्रेस वेसाठी वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. शक्तीपीठ महामार्ग राज्याच्या कोणत्या भागातून जाणार आहे, याची सविस्तर माहिती एनडीटीव्हीच्या हाती आलेलेत. महाराष्ट्रातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या महामार्गाच्या उभारणीसाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शक्तीपीठ महामार्गासाठी पर्यावरण मंजुरीसाठी MSRDC कडून अर्ज दाखल करण्यात आला असून, या अर्जासोबत महामार्गाचे आरेखन देखील सादर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडे मंजुरीसाठी अधिकृतपणे प्रस्ताव पाठवला आहे.