हवामान वाढीमुळे गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकरांची अक्षरशः उष्णतेमुळे काहीली होतीये. त्यामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झालाय. उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी महानगरपालिकेनं मात्र मार्गदर्शक अशा सूचना केल्या. मुंबईमध्ये जाणवत असलेल्या उष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काय करावं आणि काय करू नये याबाबत, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सूचना देण्यात आल्यात.