केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये सांगलीच्या आटपाडी तालुक्यातील मिटकी येथील प्रवीण कोळपे हा देशात 584 व क्रमांक मिळवत उत्तीर्ण झाला आहे.प्रवीण कोळपे यांनी मोठ्या जिद्दीने सहाव्या प्रयत्नात युपीएससीचे शिखर सर केले आहे.वडिलांचे छत्र हरपल्यानंतर आईने शेतात मोलमजुरी करून प्रवीणचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिलं,यामुळे प्रवीण याने हे यश मिळवत आपल्या आई-वडिलांने पाहिलेले जिल्हाधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण केला आहे, या यशानंतर प्रवीण याच्यवर कौतुकांचा वर्षा होत असून नातेवाईक ग्रामस्थांकडून प्रवीण याचा सत्कार देखील करण्यात आला आहे.दरम्यान प्रवीणच्या आई आणि आजी कडून देखील प्रविणचे भरभरून कौतुक करण्यात येत असून,नातू अधिकारी झाल्याने आता लाल दिव्याच्या गाडीतून मला फिरायचं आहे,अशी आनंद भावना प्रवीणच्या आजीने यावेळी व्यक्त केली.