मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नगरसेवकांना मार्गदर्शन करणार आहेत.त्यासाठी दादर येथील पक्ष कार्यालयात दोन दिवसीय मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं आहे.महापौर रितू तावडे यांच्या हस्ते शनिवारी शिबिराचं उद्घाटन झालं. २२ वर्षानंतर भाजपने मुंबई पालिका जिंकली असून सत्तारूढ पक्ष होण्याचा मान मिळवला आहे.निवडून आलेल्या नगरसेवकांमध्ये काहीजण पहिल्यांदा निवडून आले आहेत...जुन्या आणि नव्या नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजाची माहिती व्हावी या उद्देशाने शिबिर आयोजित करण्यात आलं आहे.